आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांना आजपासून नाकावाटे इन्कोव्हॅक लस

मुंबई : नाकावाटे देण्यात येणाऱ्या इन्कोव्हॅक लशीची प्रतिबंधात्मक मात्रा आजपासून ६० वर्षे आणि त्यावरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लशीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे. मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ही मात्रा घेता येणार आहे.

Screenshot 2023 0427 133512172213840565051751

मुंबई महापालिका क्षेत्रातील २४ ठिकाणी इन्‍कोव्‍हॅक लस ‘ऑन द स्पाट’ नोंदणीद्वारे देण्यात येईल. २४ विभागांतील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते बृहन्मुंबई महापालिकेच्या ट्विटर खात्यावर दररोज प्रसारित करण्यात येतील. पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लशीची प्रतिबंधात्मक मात्रा घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये