कोथरुड

कोथरूडमध्ये भर चौकात टुरिस्ट सीएनजी कारने घेतला पेट ; पहा व्हिडिओ

कोथरूड : कोथरूड, एरंडवणा येथील गणेशनगरमधील गुळवणी महाराज रस्त्यावरील बलकवडे चौकात सीएनजी टुरिस्ट कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. मनसेचे पदाधिकारी असलेले मंदार बलकवडे यांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाण्याचा फवारा करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाने आशी आणली आग आटोक्यात ; खालील व्हिडिओ पहा..

आज मंगळवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. हुंदाई कंपनीची एम.एच १२ क्यू.जी ४५९२ ही  सीएनजी कार गुळवणी महाराज रस्त्यावरील बलकवडे चौकात आल्यानंतर त्याच्या बोनेट मधून अचानक धूर निघू लागला. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. रस्त्यातच भरचौकात हा प्रकार घडल्याने गोंधळ निर्माण झाला होता.  बोनेट मधून धूर येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्यातच थांबवली. चालका बरोबर गाडीतील दोन प्रवाशांनी गाडीतून बाहेर पडत दूर पळत आल्याने अनर्थ टळला.

मनसेचे पदाधिकारी असलेले मंदार बलकवडे यांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दल व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोनेटवर पाण्याचा फवारा मारत आग आटोक्यात आणली.

या संदर्भात बोलताना मंदार बलकवडे म्हणाले की, सीएनजी टुरिस्ट कारला अशाप्रकारे आग लागत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. प्रवाशी हे निसंकोचपणे अशा टुरिस्ट कार मधून प्रवास करत असतात परंतु त्यांच्या सुरक्षेची काळजी टुरिस्ट कंपनी घेत नसल्याचे अशा घटनेतून पुढे येत आहे. या घटनेत टुरिस्ट कंपनीची की कार कंपनीची चूक आहे याची चौकशी केली जावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये