पुणे शहर

वारजेत दिव्यांग मुलांनी अनुभवली आईस्क्रीम पार्टी ; आनंद, मनाचा वेध घेणाऱ्या गोष्टी, समाधान यामुळे पार्टी ठरली संस्मरणीय..

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, वारजे यांचा उपक्रम

वारजे : दिव्यांग, स्पेशल मुलांसाठी काम करत असलेल्या प्रा. फाऊंडेशन मधील विशेष मुलांकरीता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, वारजे शाखेच्या वतीने आईस्क्रिम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पन्नास ते साठ मुलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात मुलांनी मनसोक्त आईस्क्रीम पार्टीचा आनंद लुटला. कडक उन्हात आईस्क्रीममुळे पोटाला मिळालेला थंडावा मुलांना समाधान देऊन गेला.

प्रा. फौंडेशन गेली अनेक वर्षे दिव्यांग, स्पेशल मुलांसाठी काम करते. प्रतिकूल परिस्थितीत देखील या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा एक यशस्वी प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केलाय. दिवाळी किंवा सणांच्या काळात पणत्या बनवणे, रंगवणे याशिवाय कापूर तयार करुन त्याचे आऊटलेट मार्फत विक्रीसाठी ठेवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने या मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे.

यावेळी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, जिल्हा उपाध्यक्ष (महिला आघाडी) शिल्पा महाजनी, जिल्हा सरचिटणीस विकास अभ्यंकर, शाखा अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, शाखा अध्यक्ष (महिला आघाडी) शैला सोमण, उपाध्यक्ष हेमंत कासखेडीकर, जयश्री कासखेडीकर, सविता राजाज्ञ, अपर्णा कुलकर्णी, अपर्णा कुंतूरकर, अभिनव पाठक, दत्तात्रय देशपांडे, दयाकर दाबके आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वारजे शाखेतर्फ करण्यात आले. शाखेच्या वतीने, सर्व मुलांना आवश्यक वैद्यकीय साहित्य (Adult Dypers व बेड शीट्स यावेळी एक कर्तव्य म्हणुन भेट देण्यात आले.

Img 20220425 wa0010282295230586519690125679

दैवाने आपल्याकडून सगळे काही काढुन घेतलंय पण आमच्या आतील आत्मविश्वास, जिद्द अजूनही जागृत आहे. त्या जोरावर आम्ही आमचे आयुष्य घडवू असा विश्वास या मुलांच्या चेहऱ्यावर यावेळी जाणवला. संस्थेच्या मुख्य संचालिका डॉ प्राजक्ता कोळपकर यांनी मुलांबद्दल च्या सांगितलेल्या घटनांनी मन हेलावून गेल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

“तुझे केस किती छान आहेत ग, कौतुकाने एकीला विचारले असता “हो काका, हे केस मी एका कॅन्सर पेशंट ला दिले, माझ्याकडे दुसरा असा कुठलाच अवयव नाही ना की ज्याचा त्याला उपयोग होईल..म्हणून मी केस दिले !” या तिच्या उत्तराने उपस्थितांचे डोळे अक्षरशः पाणावले. आनंद, मनाचा वेध घेणाऱ्या गोष्टी आणि समाधान यामुळे ही आईस्क्रीम पार्टी संस्मरणीय ठरल्याचे मंदार रेडे यांनी सांगितले.

Img 20230524 wa0032
Img 20230524 wa0027
Fb img 1683737623349

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये