कोथरुड

बावधनमध्ये मोफत कोरोनानिदान चाचणी कॅम्पचे आयोजन

कोथरूड : माझा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग या अभियानाअंतर्गत परिसरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित जपले जावे.यासाठी नगरसेवक दिलीप वेडेपाटील व पुणे महानगरपालिका यांच्या विद्यमाने रॅपिड अँटिजेन टेस्ट द्वारे बावधन भागामध्ये मोफत कोरोना निदान चाचणी कॅम्प आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एल.एम.डी. चौक, बावधन खुर्द आणि मनपा शाळेजवळ,बावधन गावठाण. येथे मोफत कोरोना निदान चाचणी कॅम्प आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.या अभियानाअंतर्गत १३० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामधील १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

‎यावेळी ज्या नागरिकांची टेस्ट पॉजिटीव्ह आली त्या नागरिकांना आयसोलेशन करून क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांना त्रास जाणवत असेल त्यांनी पुढे येऊन आपली तपासणी करून घ्यावी. असे आवाहनही नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केले आहे.


Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये