पुणे शहर

वारजे तपोधाम मधील अपघाताला कारणीभूत ठरणारे वृक्ष काढण्याची मागणी ; अधिकाऱ्यांकडून पाहणी..

काही दिवसापूर्वीच झाडाला धडकून तरुणाचा झाला होता मृत्यू

वारजे : कर्वेनगर प्रभागातील वारजे तपोधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर च मधोमध असणारे वृक्ष अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. दोनच दिवसांपूर्वी झाडाला गाडी धडकून झेलेल्या अपघातात एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे हे धोकादायक वृक्ष काढण्याची मागणी होत आहे.

Img 20240130 wa00205927679133677101234

या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी पुणे महानगर पालिकेचे वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य सहाय्यक मनपा आयुक्त व वृक्ष अधिकारी विजय नायकल या भागातील वृक्ष विभागाचे मिस्त्री डोळस यांना घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व परिस्थितीची माहिती दिली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनीही अधिकाऱ्यांना धोकादायक झाडांमुळे घडत असलेल्या अपघाताची व अडथळ्याची माहिती दिली.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

स्वप्नील दुधाने म्हणाले, गेल्या तीन वर्षांत या रस्त्यावर तपोधम रस्त्याच्या मधोमधच असणाऱ्या वृक्षांमुळे अनेक अपघात झाले असून काही दिवसापूर्वी उमेश मारणे या तरुणाचा झाडाला धडक लागल्याने मृत्यू झाला होता. त्यावेळी मारणे कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आणि तब्बल तीन लोकांचे प्राण वाचवले.

या रस्त्यावरील झाडांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू नये, यासाठी प्रयत्नशील असणे, आवश्यक होते. याचसाठी आपण सहाय्यक मनपा आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, पुणे मनपा यांना निवेदन देऊन रस्त्यावर असणारे धोकादायक वृक्ष कायमस्वरूपी काढण्यात यावे, अन्यथा स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी अधिकारी वर्गानेही सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचा शब्द दिला असल्याचे दुधाने यांनी सांगितले.

Img 20231112 wa00053541767882370111537
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये