दिवाळी सरंजाम किट देऊन सफाई कर्मचाऱ्यांप्रती हर्षवर्धन मानकर यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त..

कोथरुड : pune city, Kothrud प्रभाग क्रमांक ११ केळेवाडी , रामबाग कॉलनी परिसराच्या स्वच्छतेची वर्षभर काळजी घेणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्याकडून दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले.
हनुमान नगर, रामबाग कॉलनी, जय भवानीनगर आणि सुतारदरा या चार कोठीतील सर्व कामगारांना हे दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य निरीक्षक नवनाथ मोकाशी, आरोग्य निरीक्षक संतोष ताटकर, आरोग्य निरीक्षक सतिश बनसोडे, आरोग्य निरीक्षक गणेश चोंधे यांच्यासह दिलीप कानडे, दत्ता गायकवाड, भुषण शिर्के, रोहिदास जोरी, विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, प्रकाश नलावडे, नवनाथ तोंडे व कार्यकर्ते आणि सफाईसेवक उपस्थित होते.
हर्षवर्धन मानकर म्हणाले की, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी कायम तत्पर असतात. परिस्थिती कितीही अडचणीची असली तरी ते मागे हटत नाहीत व आपले काम चोख करतात. याचा प्रत्यय कोविड च्या परिस्थितीत सर्वांनाच आला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी हा सरंजाम वाटपाचा उपक्रम राबवला आहे.




