चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरवारे कॉलेजमधील कोविड सेंटरला नगरसेवक राजाभाऊ बराटे व विठ्ठल बराटे यांच्यावतीने २० जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भेट…

कोथरुड : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन नगरसेवक राजाभाऊ बराटे, कोथरुड मतदार संघाचे सरचिटणीस विठ्ठल बराटे यांच्या वतीने २० ऑक्सीजान जंबो सिलेंडर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कॉलेज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्यान समिती यांच्या माध्यमातून चालु होत असलेल्या ऑक्सिजन बेड कोविड सेंटरला भेट देण्यात आले. On the occasion of Chandrakant Patil’s birthday, 20 jumbo oxygen cylinders were gifted to Covid Center in Garware College on behalf of corporator Rajesh Barate and Vitthal Barate.
यावेळी प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, महपौर मुरलीधर मोहोळ, मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दीपक पोटे , वृतपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष विजय पारगे, कोथरुड भाजप चिटणीस विशाल रामदासी, कोथरुड युवा मोर्चा सरचिटणीस ऋषिकेश बराटे, दिपक पवार, श्रीपद ढेकने, प्रभाग ३१ अध्यक्ष हेमंत बोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन भोसले, महेश पोहेनेरकर, सुहास दाबेकर, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था सचिव शास्त्री सर, रवी देव, चंद्रकांत धोत्रे, प्रकाश डोख, संजय दळवी, संदीप खुटाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजप कोथरुड मतदार संघाचे सरचिटणीस विठ्ठल बराटे यांनी केले होते.

जनसेवेचा वारसा घेतलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सर्वसामान्य नागरीकांना उपयोगी पडेल अशा विधायक उपक्रमाने साजरा करायचा असे ठरवून २० ऑक्सीजनचे जंबो सिलेंडर ऑक्सिजन बेड कोविड सेंटरला भेट देण्याचा कार्यक्रम घेण्यात आल्याचे नगरसेवक राजाभाऊ बराटे व विठ्ठल बराटे यांनी सांगितले.



























