महाराष्ट्र

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार, दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड  या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे.

Img 20241011 wa00155017687067140315753

भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.

Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये