भेलकेनगर येथील नवभारत मित्र मंडळाचा यंदा चांद्रयान 3 विक्रम लँडर हा हलता देखावा

पुणे : कोथरूडमधील भेलकेनगर येथील नवभारत मित्र मंडळाने यंदा चांद्रयान 3 विक्रम लँडर हा हलता देखावा सादर केला आहे. मंडळ दर वर्षी वैज्ञानिक देखावा सादर करीत असतो ज्यामधून मुलांना सविस्तर माहिती मिळून हलत्या देखाव्या मुळे मुलांना त्याची उत्तम माहिती मिळू शकेल हाच मंडळाचा त्या मागील हेतू आणि ह्याच कारणा मुळे श्रोत्यांचा मंडळाचा देखावा पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि दरवर्षी श्रोते आपणहून देखावा पाहण्या साठी सह परिवार आवर्जून येतात.
सन २०१९ साली मंडळाने सादर केलेल्या चंद्रयान -२ देखाव्याची दखल श्रोत्यां सोबतच पुण्य नगरीतील नवसाला पावणारा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनेही घेतली आणि ह्यासाठी नवभारत मित्र मंडळाला पश्चिमी विभागात वैज्ञानिक देखावा सादरीकरण साठी प्रथम पारितोषिक जाहीर केले तसेच गेल्या वर्षी केलेल्या सूर्यमाला ह्या देखव्यास पुणे शहरातून द्वितीय पारितोषिक मिळाले. ह्या वर्षी मंडळाने चांद्रयान -३ विक्रम लेंडर हा हलता देखावा सादर केलेला असून त्यामध्ये सर्व माहिती सुद्धा दिलेली आहे.



















