राजकीयराष्ट्रीय

गोव्यात शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर

पणजी : गोव्यात शिवसेनेने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नऊ उमेदवारांची ही यादी आहे. आरएसएसमधून भाजपमध्ये आलेले शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. शिवसेना गोव्यात १२ जागांवर लढणार आहे. त्यापैकी शिवसेनेने आज ९ जागांवरील उमेदवारांची यादी घोषित केली आहे. तसेच उद्यापर्यंत तीन जागांची घोषणा करणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. आज ९ जागांची यादी जाहीर करत आहोत. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील. विधानसभेत शिवसेनेचे आमदार जातील, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेची पहिली यादी
पेडणे- सुभाष केरकर, मापसा- जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, पणजी – शैलेंद्र वेलिंगकर, पर्ये- गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर, केपे- अ‍ॅलेक्सी फर्नांडिस

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये