पुणे शहर

चांदणी चौकात भरधाव डंपरची रिक्षाला धडक; एमआयटी शाळेचे पाच विद्यार्थी गंभीर जखमी

पुणे : पुण्यातील चांदणी चौकात भरधाव डंपरने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाने डंपरला धडक दिली. या अपघातात चार ते पाच शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही सर्व एमआयटी प्री स्कुलची मुले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. यातील तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये तर एका विद्यार्थ्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शाळा सुटल्यानंतर ही रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई बेंगळुरू महामार्गावरून जात होती. त्यावेळी भरधाव असलेली रिक्षा भुयारी मार्गात डंपरला जाऊन धडकली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवले. चार मुली एशियन हॉस्पिटलमध्ये आणि एक मुलगा चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. हे सर्व केजी चे विदयार्थी आहेत. नुकत्याच वाघोली येथे स्कूल बसला झालेल्या अपघातानंतर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला झालेला हा दुसरा अपघात आहे.

Img 20231109 wa0012281291226259195260975368
Img 20230717 wa0012281294586790481769091554
Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20230812 wa0001281295283768095978676207
Img 20231109 wa00107449750233581593236

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये