पुणे शहर

विद्यापीठ उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे :विद्यापीठ उड्डाण पुलाच्या कामास लवकरच सुरूवात होईल आणि तेथील वाहतूक सर्वांसाठी सोयीस्कर होईल असे नियोजन असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअर दरम्यानच्या उड्डाण पुलासंदर्भात पुणे युनिफाईड मेट्रोपोलिटन ट्रान्स्पोर्ट अॅथॉरिटी ( पुमटा ) ची बैठक आज गुरुवारी झाली. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, पीएमआरडीएचे विवेक खरवडकर, पुणे महापालिकेचे व्ही.जी. कुलकर्णी उपस्थित होते.

Img 20211105 wa0169

वाहतूक नियंत्रण आणि युटीलिटी शिफ्टींग याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाहतूक नियंत्रणासंदर्भात टाटा कंपनीने आराखड्याचे सादरीकरण केले. येणाऱ्या दिवसांमध्ये पुणे मनपा, वाहतूक विभाग, पीएमपीएमएल, पीएमआरडीए, PITCMRL व नागरिक यांचेशी वेळोवेळी चर्चा करून पुणे विद्यापीठ येथील वाहतूक सर्वांसाठी कशी सोयीस्कर होईल यासाठी प्रयत्न करणार आहे असे आमदार शिरोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये