पुणे शहर

ट्रॅव्हल्स बस चालकाचा महिलेवर बलात्कार; पुण्यातील वर्दळीच्या भागातील घटना

पुणे : पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट आणि कात्रज परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नवनाथ शिवाजी भोंग याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून पीडित महिला तिच्या पतीसमवेत काम शोधण्यासाठी पुण्यात आली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड परिसरात झोपण्यासाठी ते जागा शोधत होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोंग  ( वय 38, रा.वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) याने दांपत्याला माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार असं सांगितलं. आरोपीवर विश्वास ठेवून दोघे बसमध्ये आराम करण्यासाठी गेले.

पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपीने संधी साधत बस दुसरीकडे नेली. ‘तू जर आरडाओरड केलीस तर जीवे मारुन टाकेन’ अशी धमकी त्याने महिलेला दिली. यानंतर स्वारगेटजवळ फुटपाथच्या बाजूला बस थांबून त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर कात्रज बसस्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा बलात्कार केला.

Img 20220610 wa0330

यानंतर आरोपीने महिलेला बसमधून खाली उतरवलं आणि तेथून पसार झाला. पीडित महिलेने स्वारगेट येथे पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर ट्रॅव्हल्स चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना बंगळुरु महामार्गावर आरोपीला जेरबंद करून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये