चांदणी चौकातील वाहतुकीत मोठा बदल, वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना,असा झाला आहे बदल…

पुणे : पौड रस्त्यावरील चांदणी चौकामध्ये सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे चांदणी चौकातील वाहतुकीमध्ये पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून बदल करण्यात आला आहे. अशी माहिती वाहतूक उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.Changes in traffic at Chandni Chowk, measures taken by the traffic police have changed
चांदणी चौक पुलावरून कोथरूड व सातारा हायवे च्या दिशेने जाणारा सर्विस रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग -१) भुगाव, एनडीए रस्ता व कोथरूड मार्गे येणारी वाहतूक ही चांदणी चौक पुलावरून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विवा इन हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून हायवेवरून चांदणी चौक व सातार्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.

२)पाषाण व बावधन कडून येणारी वाहतूक चांदणी चौक पुलावर न जाता ती वाहने वीवा ईन हॉटेल येथे उजवीकडे वळून हायवेवरुन चांदणी चौक, सातार्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा वरीलप्रमाणे वाहतूक बदलाबाबत वॉर्डन व वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.



