पुणे शहर

व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आमदार शिरोळेंचे आश्वासन

पुणे : व्यापारी आघाडी शिवाजीनगर व अखिल वडारवाडी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने आज आमदार सिध्दार्थ शिरोळे यांची भेट घेतली. यावेळी व्यापारी वर्गाला जाणवणाऱ्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. 

लॉकडाउन मध्ये व्यापारी वर्गाला जाणवणाऱ्या समस्या, दुकानांच्या वेळांमध्ये काही बदल करण्यासाठी तसेच लाईट बिला संबंधी तक्रारींवर यावेळी चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर शिरोळे यांनी त्यावर तोडगा काढण्याची हमी दिली आहे. तसेच संघटनेकडून निवेदन सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्तात्रय खाडे, शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे, शिवाजीनगरचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास डाबी, सोशल मिडिया अध्यक्ष निलेश धोत्रे , अखिल वडारवाडी व्यापारी संघटने अध्यक्ष संजय डांगी, उपाध्यक्ष पंकज उणेचा, पुनाराम चौधरी,
सेक्रेटरी सुरेश चौधरी, संपर्कप्रमुख प्रकाश गोस्वामी, संघटनेचे मार्गदर्शक घिसुलालजी भाटी, शंकर अलकूंटे, ज्येष्ठ  व्यापारी नारायण चौधरी  खजिनदार कैलास डांगी आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये