कोथरूडमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित, वीजभार कमी- अधिक झाल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान; महावितरणने तातडीने उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांची मागणी

पुणे : कोथरूड मधील बऱ्याच भागात वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे आणि त्यात पावसामुळे तर अजूनच वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा वीज गेल्यास ती पुन्हा 3-4 तासांनी येत आहे, तर काही भागात याहून अधिक वेळ वीज जात आहे. तसेच विजेचा भार कमी जास्त होत असल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे बंद पडत आहेत व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व हाल सुद्धा होत आहे.
या सर्व विषयास अनुसरून राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने आज कोथरूड महावितरण अभियंता राजेश काळे यांना निवेदन देण्यात आले व याकडे लक्ष देऊन वारंवार वीज खंडीत होणार नही याची दक्षता घेतली पाहिजे अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांची मागणी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
या वेळी काळे यांनी आश्वासन दिले आहे की, या विषयावर गांभीर्याने उपयोजना करू आणि वारंवार वीज खंडीत होण्यापासून नागरिकांची सुटका करू.







