पुणे शहर

म्हाळुंगे टीपी स्कीम लवकर मान्यता मिळावी. या मागणीसाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

पुणे : म्हाळुंगे टीपी स्कीम लवकरात लवकर मान्यता घेऊन विकास कामांना गती मिळावी या मागणीसाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले आहे.

अमोल बालवडकर म्हणाले, आपल्या संकल्पनेतून सुरू झालेला म्हाळुंगे टीपी स्कीम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सदर टीपी स्कीम योजना ही येथील स्थानिक नागरिक व  शेतकऱ्यांना मान्य आहे.

पीएमआरडीए च्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून या प्रकल्पावर काम सुरू आहे, परंतु अजून या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळालेली नाही. काही तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या योजनेचा आराखडा तयार व्हावा व अंतिम मान्यता मिळावी. तसेच लवकरात लवकर या भागात विकास कामे सुरू व्हावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून केली आहे.

या योजनेची अंमलबजावणी झाल्यास संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलून सामाजिक व आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल, त्यामुळे सदरील प्रकल्प मार्गी लागणे महत्वाचे आहे, असा विश्वास पत्राद्वारे अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये