पुणे शहर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात

पुणे : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येरवडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बिंदू माधव चौक, शाहदलबाबा रोड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.


त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी फराळ व लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक एकोपा आणि सेवाभाव जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमास येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते शंकर चव्हाण, माजी नगरसेवक जानू आखाडे, विभागप्रमुख किशोर पाटील, उपविभागप्रमुख विलास नलावडे, बाळासाहेब मोहिते, भरत शेंडगे, जयवंत भोसले, संतोष भोसले, भूषण जाधव, प्रशांत मोरे, अमर समुद्र, सिद्धार्थ भालेराव, तारीख शेख, आसिफ शेख, संतोष खताळ यांच्यासह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालत समाजसेवा आणि जनहिताचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Img 20251125 wa01782121520512185783132

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये