भव्यदिव्य गंगा पूजन सोहळयात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवशंकराची पूजा : किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजन..

नागरिकांचा आशीर्वाद कायम किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी : चंद्रकांत पाटील
पुणे : आपल्या हिंदू परंपरेमध्ये हिंदू तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यायची प्रत्येकाला आस असते भूक असते. हे दर्शन घेतल्यानंतर माणूस धन्य होतो, एक आत्मिक समाधान या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला मिळते. नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी एवढया मोठ्या संख्येने नागरिकांना काशी विश्वनाथाचे दर्शन करून आणल्याने एक मोठे पुण्याचे काम केले आहे. या नागरिकांचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
किरण दगडे पाटील आयोजित काशी विश्वनाथ यात्रेवरून आलेल्या नागरिकांचा भव्यदिव्य गंगा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शंकर महादेवाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक किरण दगडे पाटील, पियुषा किरण दगडे पाटील तसेच महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भिमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे, नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक, दिलीप वेडे पाटील, अमोल बालवडकर आदी उपस्थित होते. पाच हजाराहून अधिक नागरिक या गंगा पूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, किरण दगडे पाटील यांचा कोणताही कार्यक्रम हा भव्य दिव्य आणि व्यापक असतो. एखादा माणूस किती प्रकारची कामे करू शकतो हे किरण कडे बघून लक्षात येते. कोणत्याही कामात कंटाळा नाही, खर्चाची चिंता नाही. सातत्याने समाजासाठी काही तरी करण्याची या दोघा नवरा बायकोची तयारी असते.
विकास कामे तर केलीच पण त्याबरोबर कोरोना काळात कोविड सेंटर उभारले, प्रत्येक दिवाळीला सरंजाम चालू आहे, २५०० नागरिकांसाठी काशी विश्वनाथ यात्रा आयोजित केली. अनेकांकडे पैसा असतो पण तो लोकांसाठी खर्च करण्याची दानत नसते ती दानत किरण दगडे पाटील यांच्याकडे आहे. काशी विश्वनाथ यात्रेच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा त्यांनी पूर्ण करून दिला आहे.










जगदीश मुळीक यांनी मनोगत व्यक्त करताना पूर्वी हिंदू तीर्थ क्षेत्रांची अवस्था व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थ क्षेत्रांचा केलेला विकास, काशी विश्वनाथ परिसराचं रूप कस बदललं यावर भाष्य केलं.
यावेळी प्रास्ताविक करताना किरण दगडे पाटील यांनी प्रभागात केलेल्या कामाची माहिती देतानाच काशी विश्वनाथ यात्रा कशा पद्धतीने पार पडली याची माहिती दिली. प्रभागात कामे करत असताना लोकांसाठी काही तरी करत असताना विरोधक कशा पद्धतीने अडथळा निर्माण करतात याचा उल्लेख त्यांनी केला. त्याचाच धागा पकडून बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी किरण दगडे पाटील यांचे काम जनतेच्या मनात आहे. त्यामुळे विरोधकांचा हेतू साध्य होणार नाही. आमदार भिमराव तापकीर यांनी ही किरण दगडे पाटील करत असलेल्या विकास कामांचे कौतुक केले. यावेळी गंगा पूजन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.






