पुणे शहर

ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा उपक्रम ; प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी धानोरीकरांचे केले अभिनंदन

धानोरी : माता जिजाऊ प्रतिष्ठान, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, युवा नेते विशाल टिंगरे आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून धानोरी येथे ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धानोरीकरांचे अभिनंदन  केले.

Img 20251125 wa00126624322614302660332

मोहोळ म्हणाले, 2047 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचे विकसित भारत, सुदृढ आणि बलशाली भारत बनविण्याचे स्वप्न आहे. आजचा  धानोरीतील मॅरेथॉन स्पर्धेचा त्याचाच एक भाग आहे.   पर्यावरणाचा समतोल, संवर्धन, आरोग्य असे अनेक संदेश देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मागील १० वर्षात फिट इंडिया, खेलो इंडिया असे वेगवेगळे उपक्रम देशभरात राबवून खेळाला चालना आणि प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. आजचा अनिल टिंगरे यांनी आयोजित केलेली ग्रीन मॅरेथॉन ही स्पर्धा त्यातीलच एक भाग असल्याचे प्रतिपादन मोहोळ यांनी केले. या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे दहा हजार नागरिक सहभागी झाल्याचे पाहून त्यांनी धानोरीकरांचे अभिनंदन तर केलेच तर पर्यावरणाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सहभागातून दिसून आल्याचे मोहोळ म्हणाले.

धानोरी जकात नाका येथून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी झेंडा दाखविल्या नंतर स्पर्धेला सुरुवात झाली. वय १५ ते त्यापुढील सर्व वयोगटासाठी पुरुष व महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. धानोरी वन उद्यान याठिकाणी स्पर्धेचा समारोप झाला. विजेत्याना सायकल तसेच रोख स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव,  संतोषलाला खांदवे, नितीन भुजबळ, धनंजय जाधव, संदीप मोझे, संगीता दांगट, विठ्ठल कोथेरे, वंदनाताई खांदवे, वैशालीताई जगताप, पूजाताई जाधव, सुनीताताई मोझे, संदीप दांगट, लिंगू साखरे, विशाल टिंगरे, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, जगदीश देशपांडे, जितेंद्र जगताप, बाबुराव टिंगरे, बाळासाहेब टिंगरे, महेश टिंगरे, नितीन टिंगरे, निवृत्ती चौधरी, काळूराम टिंगरे, शशिकांत झरेकर, रत्नकांत ढवण, अतुल परांडे, संदीप टिंगरे, राहुल परांडे, प्रमोद परांडे यासह माता जिजाऊ प्रतिष्ठान, ग्रीन अवनी संस्था, लोहगाव रेसिडेंटल वेलफेअर असोसिएशन, वनविभाग, विविध संस्था, मंडळे, प्रतिष्ठानचे कार्यकर्त, प्रभाग एक कळस, धानोरी, लोहगाव मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन राजू कुलकर्णी यांनी केले. धानोरी वन उद्यानात वृक्षा रोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये