कोथरुडमध्ये आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांचा पोशाख व फराळ देऊन दीपावलीनिमित्त सन्मान..

कोथरुड : pune city, Kothrud कोथरूड येथील श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या वतीने कोथरूड मधील आरोग्य कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या सर्व कर्मचाऱ्यांना पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आयोजक ॲड. योगेश मोकाटे म्हणाले की, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी फराळ व सन्मानाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतो. परंतु गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम घेता आला नाही. कोरोनाच्या कठीण संकटकाळात हे सर्व कर्मचारी योद्धे बनुन जीवावर उदार होऊन काम करत होते व आजदेखील करत आहेत. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करून त्यांचा यथायोग्य सन्मान करत आहोत व त्यांचे आभार मानत आहोत.

यावेळी संस्थेचे श्री प्रमोदजी देशमुख, महेंद्र काळे, शिरीष राणे, श्री शिवाजी गाढवे ,नितीन शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. आरोग्य मुकादम वैजनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी आभार मानले. आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, रुपाली शेडगे, संतोष ताटकर, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सर्व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































