कोथरुड

कोथरूड वॉकेथाॅनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजन

कोथरूड : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कोथरूड वॉकेथाॅनमध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. रविवारची रम्य सकाळ आणि वॉकेथाॅनमध्ये सहभाग घेण्यासाठी जमा झालेले हजारो नागरिक असे चित्र कोथरूडमध्ये डीपी रस्त्यावर पहायला मिळाले.

Img 20250921 wa01192309541937897010994


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त श्वेता अमित तोरडमल आणि अमित शरद तोरडमल यांच्या माध्यमातून या कोथरूड वॉकेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. या वॉकेथाॅनमध्ये सहभागी झालेल्यांना मेडल, टी शर्ट आणि सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वच्छ कोथरूड, स्वस्थ कोथरूड’ हा संकल्प घेऊन कोथरूड वॉकेथाॅनचे उत्तम रित्या नियोजन केल्याने आयोजक श्वेता तोरडमल व अमित तोरडमल यांचे कौतुक केले.

Img 20250508 wa00014407724251968801054

सकाळी ७ वाजता वॉकेथाॅनची सुरुवात शांतीबन गणेश मंदिरापासून झाली. एकलव्य चौक, महात्मा सोसायटी, सहजानंद चौक या मार्गाने जाऊन कुमार परिसरातील डीपी रस्त्यावर या वॉकेथाॅनची सांगता झाली. १००० हून जास्त नागरिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला.   निरोगी आयुष्यासाठी व्यायाम हा खूपच महत्त्वाचा असतो हा संदेश जनमानसांत रूजवण्यासाठी तसेच “स्वच्छ कोथरूड स्वस्थ कोथरूड” हा संकल्प घेऊन या वॅाकेथॅान चे नियोजन करण्यात आल्याचे श्वेता अमित तोरडमल व अमित तोरडमल यांनी सांगितले.

Img 20250921 wa01222312589020739082291

यावेळी कोथरूड मध्य मंडलाचे अध्यक्ष निलेश कोंढाळकर, खडकवासला पश्चिम मंडलाचे अध्यक्ष गणेश वरपे, डॉ. संदीप बुटाला, विठ्ठल बराटे, अनुराधा एडके, स्वप्निल राजीवाडे, सचिन मोकाटे,  राम धुमाळ, तसेच मंडलाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Fb img 17575688025518630244243602003405

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये