पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोथरूडमध्ये गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान..

माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन..
कोथरूड : पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार भिमराव तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” अंतर्गत प्रभागातील १० वी व १२ वी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच प्रभागातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा कोथरूड मधील भुसारी कॉलनीतील शुभेच्छा कार्यालय संपन्न झाला. माजी नगरसेविका अल्पना गणेश वरपे व भाजपा प्रभाग क्र १० च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर प्रथम व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूजा ढमाले , पोलिस उपअधिक्षक सीआयडी प्रियांका अवधूत, सागर शेडगे, एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे , एव्हरेस्टवीर भगवान चवले , मोटोक्राॅस चॅम्पियन ऋगवेद बारगुजे ,सीए प्रज्वल वायकर आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सागर शेडगे यांनी विद्यार्थ्यांना करिअर बाबत सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.



यावेळी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, माजी नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभूणे, तसेच प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांनी तर सूत्रसंचालन वैभव मुरकुटे व आभार प्रभाग अध्यक्ष सुरेंद्र कंधारे, प्रदीप जोरी यांनी मानले.






