एमपीएससी परीक्षेबाबत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती. या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली जात होती. त्यामुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे JEE व NEET परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम असताना राज्य सरकारने वेगळा निर्णय घेतल्याने त्याची चर्चा सुरू आहे. JEE व NEET परीक्षा ही रद्द व्हाव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. आगामी काही दिवसात याबाबत काय निर्णय होतोय का हे पाहावे लागणार आहे.



