महाराष्ट्र

राज्यात अनलॉक नाहीच; अनलॉक वरून महाराष्ट्र सरकारचा अवघ्या तासाभरात यू टर्न

पुणे : राज्यात अनलॉक नाहीच; अनलॉक वरून महाराष्ट्र सरकारचा अवघ्या तासाभरात यू टर्न महाराष्ट्र सरकारने अनलॉक करण्याच्या संदर्भात घोषणा करताच अवघ्या तासाभरात यू टर्न घ्यावा लागला आहे.(Not unlocked in the state; Government of Maharashtra U-turn in just an hour from Unlock)

राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केले. मात्र आता तासाभरातच ठाकरे सरकारने आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. या संदर्भात आता राज्य सरकारने स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Img 20210522 wa0207

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.

राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये