‘गड्या चल साफ कर बावधन’ स्वच्छ्ता मोहिमेला बावधनकरांचा प्रचंड प्रतिसाद ; स्वच्छ्ता मोहीम बनली आदर्शवत

‘गड्या चल साफ कर बावधन’ मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग, स्वच्छतेची घेतली शपथ
बावधन : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या एका अनोख्या उपक्रमात बावधनकरांच्या विशेष सहभागातून “गड्या चल साफ कर बावधन हे महास्वच्छता अभियान” आज पार पडले. बावधनकर नागरिकांनी अनपेक्षित प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभागी होत हे स्वच्छ्ता अभियान आदर्शवत बनवले.
कोथरूड- बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचा एक अनोखा स्वच्छ्ता उपक्रम आज पार पडला. बावधन ( बु.) व ( खु.) हे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली गावं. येथील स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता दिसून आली. गावकरी वर्ग, बावधन सिटीझन फोरम सारखी संस्थेमधील प्रत्येक पदाधिकारी व स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, जनवानी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, जन सुविधा फाउंडेशन, गावकरी भजनी मंडळ, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट, आदर पूनावाला, एनोरा, प्रोअर्थ, आर्ट ऑफ लिव्हींग, ग्रिन क्राऊन बावधन, सेंन्ट आणि डाऊन स्टुडिओ, सनफोम, सॉर्टिंग सॉंन्स, गणेश मंडळे व इतर स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक व गावकरी असे पाच हजार नागरिकांच्या विशेष सहभागातून आजचे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.










“स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३” अन्वये “गड्या चल साफ कर बावधन व महास्वच्छता अभियान” नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वी करण्यात आली. सदर महास्वच्छता अभियान उपायुक्त आशा राऊत व सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. केतकी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, शांताराम कुलकर्णी, गणेश साठे यांच्या निरिक्षणाखाली राबवण्यात आली.
गड्या चल साफ कर बावधन महास्वच्छता अभियानात बावधन सिटीझन फोरम यांच्या विशेष पुढाकाराने स्थानिक लोक प्रतिनिधी दिलीप वेडे पाटील व किरण दगडे पाटील, कुणाल वेडेपाटील, अभिजित दगडे पाटील, सुर्यकांत भुंडे यांच्या विशेष आवाहनाने व स्वतः सहभागाने तसेच अनेक स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, जेष्ठ श्रेष्ठ नागरिक, महिला, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी शिवाय शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, वैद्य, अभियंते, आयटी पार्क मधील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, मनपा अधिकारी तसेच ८७ सफाई कर्मचारी आणि एक हजार नागरिक असे १०८७ कर्मचारी व नागरिक यांच्या प्रत्यक्ष सहभागातून बावधन खुर्द व बुद्रूक या दोन्ही गावातील १८८ हद्दी सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत सफाई करून एकूण ५ टण ८००/- किलो कचरा जमा करण्यात आला.
संपूर्ण बावधन गांवठाण परिसरातीत पंधरा दिवसात ६०० टण ८०० कि. सार्वजनिक रस्त्यावर पडलेला राडारोडा जमा करण्यात आला. अशाप्रकारच्या प्रत्यक्ष नागरिकांच्या विशेष सहभागातून स्वच्छतेची चळवळ ही सफाई कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या प्रत्यक्षात सहभागातून व कृतीतून स्वच्छतेची चळवळ ही नागरिकांची चळवळ झाली पाहिजे तरच स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी करता येईल. जो कचरा निर्माण करतो त्यांनीच आपल्या आवारातच खतप्रकल्प करून ओला कचरा जिरवून उत्तम प्रकारे खत तयार केला तरच आपण पुणे शहर कचरामुक्त करू असे मत बावधन सिटीजन फोरमच्या दिपा प्रभू व दुष्यंत भाटीया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.



सदर महास्वच्छता अभियानात मोकादम अशोक खुडे, राम गायकवाड, बापू वाघमारे, सुरज पवार, वैजीनाथ गायकवाड, साईनाथ तेलंगी, विजय पाटील व सर्व सफाई कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने व नागरिकांच्या विशेष सहभाग व प्रत्यक्ष कृतीतून पुणे शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी व इतर स्वयंसेवी संस्थानी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेऊन पुणे शहर स्वच्छता अभियानात एक नंबर आणण्याचे आवाहन केले. स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन आठवड्यातून दोन तास आपल्या पुणे शहराच्या स्वच्छतेला व अभियानात सात्तत्य ठेवणे विषयी शपथ घेण्यात आली.






