पुणे जिल्हा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व

आम्ही ही मोठे होऊन नोकरी, व्यवसाय करायला लागल्यावर उपेक्षित हुशार मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेऊ; विद्यार्थ्यांच्या भावना

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने नुकताच शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम आयोजित करण्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

घरची अत्यंत गरिबी, काहींच्या घरातील कर्त्या कमावत्या पुरुषाचे झालेले निधन, कोरोना काळात गेलेली नोकरी, हातावरचे पोट अशा प्रतिकूल परिस्थितीत खडतर आयुष्य जगत असताना शिकण्याची जिद्द, जबाबदारी ची जाणीव, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची सचोटीची भावना अशा समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची 2023 सालची शाळा, कॉलेजची शैक्षणिक फी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मार्फत भरण्यात आली. शिक्षणासाठी व त्यांच्या गुणवत्तेला दाद म्हणुन एक खारीचा वाटा महासंघ हि शिष्यवृत्तीरुपात देत असतो.

कर्वेनगर येथे झालेल्या ह्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आयटी व्यवसायातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी, विशेषतः जपानी भाषा शिकण्याचे फायदे व त्याद्वारे जपान मध्ये मिळणारी परदेशी नोकरी या विषयावर मार्गदेशन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी केले. ऋचा पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केतकी कुलकर्णी, कमलेश जोशी, राहुल जोशी, अमोघ पाठक यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला विजय शेकदार, डॉ.प्रशांत मंझिरे, विश्राम देव, सरस्वती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कठीण प्रसंगी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलेल्या बहुमूल्य मदतीमुळे, पालकांचे डोळे अक्षरशः पाणावले व सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल महासंघाचे आभार मानले व आश्वासन दिले की शिक्षण पूर्ण झाल्यावर, उत्तम नोकरी लागल्यावर समाजातील उपेक्षित व हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊ.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये