पुणे शहर

व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला भाजप कार्यकर्ते विनोद मोहिते यांच्या घरी स्नेहभोजनाचा आनंद

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज झंझावाती दौरा काढीत पुणे शहरातील आणि कोथरूड भागातील गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. या दिवसभराच्या धावपळीतून पाटील यांनी कर्वेनगर मधील भाजपचे कार्यकर्ते विनोद मोहिते यांच्या घरी स्नेहभोजन करित कर्वेनगर मधील वडार वस्ती मधील नागरिकांशी संवाद साधला.

उद्या अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन असल्याने आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळपासून पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि घरातील गणपतीचे भेटी देत दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी या व्यस्त कार्यक्रमांतूनही पाटील यांनी कर्वेनगर मधील भाजपचे कार्यकर्ते विनोद मोहिते यांच्या घरी उपस्थिती लावत स्नेहाभोजनाचा आनंद घेतला.

Img 20230927 wa00105303476107714010856

यावेळी कर्वेनगर वडारवस्ती मधील महिलांनी चंद्रकांत पाटील यांना औक्षण करून स्वागत केले. तर विनोद मोहिते यांनी वडार समाजाची आराध्य देवता असलेल्या बजरंगबलीची मूर्ती पाटील यांना भेट म्हणून दिली.

Img 20230927 wa00116873512810002719231

यावेळी बोलताना विनोद मोहिते म्हणाले, आज चंद्रकांत दादा यांचे व्यस्त कार्यक्रम होते. मात्र त्यांनी आपल्याला सांगितल्या प्रमाणे वेळ काढत घरी येऊन स्नेहभोजन केले. चंद्रकांत दादा कार्यकर्त्यांना जपणारा आणि सन्मान देणारे नेते आहेत. यावेळी साईनाथ तरूण मंडळाच्या गणपती बाप्पाची पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका वृषाली चौधरी, दत्ता चौधरी, मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे , संदीप गुंजाळ , चन्द्रकांत सितापराव , दत्ता माने , अनिल देवकर , सौ इंदुमतीमामी चौगुले , इंदिराताई अळकुंटे आदी उपस्थित होते.

Img 20230927 wa0014281296504469064241362914
Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230812 wa0001281292979418231884101793

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये