पुणे शहर

रस्ता विकसित करण्याचे डॉकेट पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागातुन चोरी झालेचा भाजप नगरसेवकांचा आरोप राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : रस्ता विकसित करण्याचे डॉकेट पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागातुन चोरी झाल्याचा आरोप पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केला आहे. एका बड्या नगरसेवकांवर हा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.BJP corporators allege theft of road development docket from Pune Municipal Corporation’s Municipal Secretary’s Department

नगरसेवक बालवडकर यांनी पालिका आयक्तांना दिलेल्या पत्रात बालवडकर म्हणतात,  गेले अनेक वर्षापासून नागरिकांना होणारा त्रास कमी करणेसाठी बाणेर येथील सर्व्हिस रोड विकसित करणेबाबत माझे ‘स’यादी व मुख्यखात्याचे बजेट एकत्रित करून ६२ लाख रूपयांचे डांबरीकरण कामासाठी तरतुद करून त्यासाठी स्थायी समितीची घेतली असुन स्थायी समितीकडून सदर ठराव व डॉकेट नगरसचिव विभागाकडे दि. २६ फेब्रुवारी, २०२१ रोजी मान्यतेसाठी गेले असता सदर डॉकेटवर नगरसचिवांची सही दोन दिवसात होणे अपेक्षित होते.

Img 20210319 wa0097

परंतु पाठपुरावा केला असता ४-५ दिवस झाले तरी सदर ठराव हा आयुक्तांकडे गेला नाही म्हणून नगरसचिव विभागाकडील श्री. राजेश वाघमोडे (र्लक) यांच्याकडे मी स्वतः, चाबुकस्वार (ज्यु. इंजिनिअर),  महेश कड (ज्येष्ठ समिती लेखनिक) नगरसचिव विभाग यांनी पाठपुरावा केला तर उडवाउडवीची उत्तरे देत जवळपास १८ दिवस नगरसचिव विभागाकडून माझ्या कामाचा ठराव हा पुढे आयुक्तांकडेगेला नाही, म्हणून मला शंका आली असता सदर प्रकरणात मी चौकशी केली असता माझ्या असे निदर्शनास आले की, माझ्या कामाचे हे विरोधी पक्ष कार्यालयातील एका नगरसेवकाने मागवून घेतले व ते जाणिवपुर्वक परत दिले नसल्यामुळे नगरसचिव कार्यालयाला सदर कामाचा ठराव पुढे आयुक्त कार्यालयास वेळेत पाठविता आला नाही.त्यामुळे दि. १९/०३/२०२१ रोजी अंतिम वर्कऑर्डर तयार झाल्यामुळे २५ मार्चपुर्वी म्हणेज ६ दिवसांमध्ये सदर काम पुर्ण करणे हे ठेकेदारास शक्य नाही आणि संबंधित ठेकेदाराला वारंवार एक नगरसेवक यांचेकडून वर्कऑर्डर दाखविणेबाबत मागणी होत असुन काम करून देणार नाही अशी, काम केलेस तर बघ अशी धमकी देण्यात येत आहे. अशी तक्रार संबंधित ठेकेदाराने माझ्याकडे केली आहे. अशी तक्रार बालवडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Img 20210313 wa0048

तरी सार्वजनिक कामास अडथळा आणणेबाबत नविन पायंडा पडत असुन यातुन सर्वसामान्य नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागणार आहे.तरी सदर प्रकरणामुळे ज्या नागरिकांनी आम्हा सभादांना निवडुन दिले असता अशा प्रकारची कामे जर पुणे महानगरपालिकेचा सभासद करत असेल तर संबंधित सभासदावर व त्या सभासदाला पाठीशी घालणा-या अधिका-यांवर योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती. अशी मागणी नगरसेवक बालवडकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये