पुणे शहर
ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशवा यांची 321 वी जयंती साजरी करण्यात आली. पाहा व्हिडिओ…

पुणे : पुण्यातील लाल महाल येथून सकाळी मिरवणूक काढून शनिवार वाडा येथे ब्राह्मण महासंघचे कार्यकर्ते आले. तेथे अभिवादन करून “इतिहास पेशवाईचा” या शैलेश जोशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन इतिहासकार मोहन शेटे, कुंदन साठे आणि श्री गानू यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्राह्मण महासंघ च्या वतीने दरवर्षी शिव जयंती, शिव राज्याभिषेक दिवस, दिल्ली विजय दिवस साजरे करण्यात येतात.या वर्षी पासून या पुढे पेशवा जयंती सुद्धा अशीच भव्य साजरी करण्यात येईल असे महासंघचे संस्थापक आनंद दवे यांनी सांगितले. या वेळेस महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर, मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, घाणेकर, मयुरेश अरगडे, मधुरा बर्वे, हर्षद ठकार, नीता जोशी संजय देशमुख, विद्या घटवाई आणि महासंघचे पदाधिकारी उपस्थित होते.







