कर्वे रस्त्यावरून शास्त्री रस्त्याला जोडणारा ‘हा’ पूल दुरुस्तीसाठी उद्यापासून वाहतुकीसाठी बंद पुणे महापालिकेची माहिती…
पुणे : कर्वे रस्ता आणि शास्त्री रस्ता यांना जोडणाऱ्या पूना हॉस्पिटल जवळील कै. यशवंतराव चव्हाण पुल धोकादायक झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत कै. यशवंतराव चव्हाण पूलाचे बेअरिंग व एक्स्पान्शन जॉईंट बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामूळे दि. ०२/०२/२०२४ ते दि. २९/०२/२०२४ रोजी दरम्यान यशवंतराव चव्हाण पुलाच्या दोन्ही बाजुकडील वाहतूक बंद राहणार आहे.
सदरचे काम करताना वाहतूकीस अडथळा अगर काही प्रकार होवू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सदर परिसरातील वाहतूकीत बदल करणे आवश्यक आहे. याकरीता वाहतुकीत बदल करण्यात आला असून उद्यापासून 29 फेब्रुवारी पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग :-
१. सदर कालावधीत कर्वे रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी गांजवे चौक येथुन टिळक चौक छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) – खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा.
२. कर्वे रोडवरील वाहनचालकांनी खंडोजीबाबा चौक येथून छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल)- टिळकचौक मार्गे इच्छितस्थळी जावे.