राष्ट्रीय
देशाचा अर्थसंकल्प उद्या होणार सादर..

दिल्ली: उद्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे ओमिक्रोनचा देशभरात धुमाकूळ सुरू असल्याचं दिसतं आहे दुसरीकडे देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत.
संसदेच अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी आणि 14 मार्च ते 8 एप्रिल अश्या दोन टप्प्यात होणार आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरूवात झाली आहे.




