पुणे शहर

नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी ग्लायकॉफॉस्फेटचा वापर करण्यास परवानगी द्यावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

मुंबई : राज्यातील नद्या जलपर्णी मुक्त करण्यासाठी ग्लायफॉस्फेटच्या योग्य प्रमाणातील वापरास राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील नदी मधील जलपर्णी ग्लायफॉस्फेट चा वापर करून काढण्याचा प्रयोग चंद्रशेखर भडसावळे यांनी यशस्वी केला. सध्या ही नदी स्वच्छ व जलपर्णी मुक्त असून हाच पर्याय राज्यातील जलपर्णी असलेल्या नद्यांवर करावा, अशा सूचना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. परंतु ग्लायकॉफॉस्फेट वापरण्यास महाराष्ट्र प्रदूषण मंडळ परवानगी देत नाही. तरी नागरिकांच्या आरोग्यास बाधा होणार नाही, एवढ्या प्रमाणात ग्लायकॉफॉस्फेटच्या वापरास राज्य सरकारकडून जर परवानगी देण्यात आली तर राज्यातील बऱ्याच नद्या जलपर्णी मुक्त होतील. याबाबत योग्य निर्देश मंत्री महोदयांनी द्यावेत अशी मागणी विधानसभेत मंगळवारी  आमदार शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

या मागणीबाबत मंत्री महोदय उदय सामंत यांनी लवकरच पुण्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन आमदार शिरोळे यांना दिले.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30
Img 20230511 wa0002281296351682306326034196
Img 20221228 wa00016208176808646242256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये