कोथरूडचे क्षेत्रीय अधिकारी हरवले आहेत.

मनसेचे अनोखे आंदोलन
कोथरूड : कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम भेटत नसल्यामुळे मनसे कोथरूड विभागाच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले.(The field officers of Kothrud are lost.)
मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी कोथरूड मधील विविध प्रश्न व समस्यां विषयात चर्चा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांची वेळ मागितली होती. त्यांनी आज सकाळी ११ वाजता ची वेळ दिली होती. त्यामुळे आज सकाळी कोथरूड मधील काही नागरिक व महिलांसह सुधीर धावडे ठीक ११ वाजता क्षेत्रिय कार्यालयात पोहोचले. दुपारचे १२ वाजले तरी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. संपर्क केला असता “मी मीटिंग मध्ये आहे” असं मोघम उत्तर मिळालं. त्यामुळे नागरिक व महिलांचा चांगलाच संताप झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या देत अधिकारी हरवले आहेत असे आंदोलन केले. अधिकाऱ्याच्या खुर्चीला फलक लावले व निवेदन ची चिटकवले.

ह्या वेळी क्षेत्रिय कार्यालयातील कुलकर्णी साहेबांनी समजूत काढून सहाय्यक आयुक्त ह्यांची बैठक निश्चित करून देतो असे आश्वासन दिले. सुधीर धावडे ह्यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र वेडेपाटील, संजय काळे,अरुण हुलावळे, नितीन गायकवाड, सुशांत भुजबळ, आनंद पाटील, संतोष वाघमारे, हर्षद खडे, किरण जोशी, श्रीयश राऊत, आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



