आरोग्य
७३ दिवसात लस हे वृत्त खोटे

पुणे : ७३ दिवसांत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया लस बाजारात आणणार हे वृत्त साफ खोटे असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ने म्हंटले आहे की, माध्यमांनी लसीबाबत केलेले सध्याचे दावे पूर्णपणे खोटे आणि अनुमानात्मक आहेत. सध्या सरकारने आम्हाला फक्त लस तयार करण्याची परवानगी दिली असून भविष्यातील वापरासाठी ती साठवण्याची परवानगी दिली आहे. एकदा चाचण्या यशस्वी झाल्यावर सर्व आवश्यक नियम मंजूर झाल्यावर लस उपलब्ध होईल.
ऑक्सफोर्ड अॅस्ट्रॅजेनेका लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे आणि लस रोगप्रतिकारक आणि कार्यक्षम झाल्यास सिरम इन्स्टिट्यूट अधिकृतपणे त्याची उपलब्धता निश्चित करेल असे त्यांनी म्हंटले आहे.



