पुणे शहर

मराठा आरक्षणाला स्थगिती हा सरकारचा नाकर्तेपणा : लगड

पुणे : गेली अनेक वर्ष मराठा आरक्षण लढ़ा सुरु आहे परंतु प्रत्येकवेळी याबाबत राजकारण होत आहे. मागील सरकारनं कायदा करुन आरक्षण मिळणार अशा स्थितीत आणले असताना विद्यमान सरकार न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडल्यामुळे स्थगीती मिळाली आहे. यातून सरकारचा नाकर्तेपणाच दिसत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड यांनी केला आहे.

लगड यांनी म्हंटले आहे की, आमचे नेते आमदार विनायक मेटे हे या सरकारला वेळोवेळी आरक्षणाबाबत बैठक घेण्यास सांगत होते, परंतु या सरकारला जाग आली नाही. सरकारला जाग यावी म्हणून जागरण गोंधळ आंदोलनं घेतली परंतु या सरकारचे उपसमिती अध्यक्ष झोपेचे सोंग घेत होते. आणि आता आरक्षण निकाल विरोधात गेल्यावर मात्र रोज बैठक घेऊन आश्वासन देत आहेत.

या अगोदर हेच आघाड़ी सरकार राज्यात आणि केंद्रात १५ वर्ष सत्तेवर असताना आरक्षण देऊ शकले नाही. त्यांच्या मनातच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असाच समज आता मराठा समाजाचा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी आपल्या ५५ वर्षातील आयुष्यातील ३० वर्ष घालवली आहेत आणि आज ही ते समाज्यासाठी लढत आहेत. त्यांचे स्पष्ट मत आहे श्रेय कोणीही घ्या पण माझ्या मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्या. हीच मापक भुमिका ते मांडत आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचे  लगड यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये