महाराष्ट्रराजकीय

वेळापत्रक फेटाळलं,राहुल नार्वेकरांबाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?…

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली आहे. सुधारित वेळापत्रक देण्यासाठी कोर्टाने 30 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आले आहे. आज वेळापत्रक सादर न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केले आहे. वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत आम्ही समाधानी नाही. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल,  अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी केली आहे.दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल.  जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.  याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये  अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता  वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

Img 20230717 wa0012281294517541507444836162

विधानसभा अध्यक्षांचे वकिल तुषार मेहता यांनी बचावाचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तुषार मेहता म्हणाले, एकट्या शिवसेनेच्या 34 याचिका आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षांना वेळ लागत आहे. आज वेळापत्रक देण अव्यवहार्य आहे. तुम्हाला दैनंदिन वेळापत्रकची माहिती नव्हती हे आम्हाला माहित नव्हते . अनेक याचिका दाखल झाल्यामुळे सर्व याचिकांचा आढावा घ्यावा लागणार आहे.

कुठलंही वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी आहे, तेव्हा आपल्याला वेळापत्रक कळेल. तुषार मेहता म्हणाले की मी अध्यक्षांबरोबर बसतो आणि आम्ही एक वेळापत्रक ठरवतो. तर कोर्ट म्हणाले आम्ही तुम्हाला एक शेवटचा चान्स देतोय. दसऱ्याच्या सुट्टीत तुम्ही बसा आणि तीस तारखेला परत आमच्याकडे  30 ऑक्टोबरला या. जर ते वेळापत्रक आम्हाला मान्य असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही आमचे वेळापत्रक देऊ. त्यानुसार आता पुढची सुनावणी 30 ऑक्टोबर आहे.

Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये