पुणे शहर

पुण्यात महिलेने रिक्षाचालकाला रॉकेल ओतून पेटवले

पुणे : महिलेने साथीदाराच्या मदतीने एका रिक्षाचालकाला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत मुकेश सुरेश राजपूत (वय 42) हे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. उज्वला दत्तात्रय कांबळे (वय 44, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) व राजेश जगताप (वय 55, रा. शास्त्रीनगर येरवडा ) या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Img 20230717 wa0012

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश राजपूत व उज्वला कांबळे गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र राहतात. त्यांच्यात काही कारणावरून 25 जुलै रोजी वाद झाला. त्यात उज्वला यांनी मुकेश यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीनूसार उज्वला कांबळे व राजेश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला कांबळे व राजेश जगताप या दोघांनाही येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयदीप गायकवाड हे करीत आहेत.

Img 20230726 wa00214374078868156350229
Img 20230511 wa000228129
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये