महाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची बाजी;
बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी’मध्ये पुणे देशात अव्वल !

दिल्ली : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत पुणे शहराने  पुन्हा एकादा आघाडी घेतली आहे. देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुणे शहर १७ व्या क्रमांकावर होते.

तसेच केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सिटी अवॉर्ड’अंतर्गत ‘बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी’मध्ये पुणे शहराने बाजी मारली आहे.  यात पुण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत एका समारंभात स्वीकारला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी राबणाऱ्या सर्वांसह समस्त पुणेकरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुणेकरांचं हे सामूहिक यश सुखावणारं आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.

Img 20211105 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये