पुणे शहर

शाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना कराव्यात ; शिवसेना महिला आघाडीचे शिक्षण आयुक्तांना पत्र..

पुणे : पुण्यात मुलींच्या शाळेत एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा प्रकार नुकताच पुढे आल्याने खळबळ उडाली आहे . या प्रकारामुळे शाळेत मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जावीत यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना पत्र दिले असून काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

पुण्यातील मुलींच्या शाळेत २४ तारखेला
एका विद्यार्थीनीवर जो दुर्दैवी अतिप्रसंग घडला तसा परत कुठल्याही मुलींवर होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी शाळा व्यवस्थापनाने घ्यावी याबाबत काही महत्वाचे मुद्दे शिवसेना महिला आघाडी कडून सुचवण्यात आले आहेत.

तसेच या सुचवलेल्या सुचनांचे पालन करण्यासाठी शाळा प्रशासनाला त्वरित आदेश देण्यात यावेत अशी मागणी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

करण्यात आलेल्या सूचना
शाळेच्या आवारात CC TV लावावेत.
शाळेच्या आवारात व गेटवर महिला सुरक्षा रक्षक असावेत.
सुरक्षा रक्षक व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी महिलाच असाव्यात. 
शिक्षकही किमान ७५% महिलाच असाव्यात.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक शाळेच्या मुख्य द्वारावर लावण्यात यावेत.
शाळेत तक्रार पेटी ठेवण्यात यावी.
शाळांमधील मुलींच पोलीस कॅडेट तयार कराव.
शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस स्थानिक पोलीस मार्शल यांनी राऊंड मारावे.
मुलींच्या शाळेच्या बाहेर टवाळखोर मुलांचे टोळकी कायम उभी असतात त्यांना अधूनमधून चोप देण्यात यावा, त्यामुळे पोलीसांचा धाक निर्माण होईल व मुली ही बिनधोक पणे घरून शाळेत व शाळेतून घरी जातील.

अशा पध्दतीने मुलींच्या सुरक्षेसाठी नियोजन करावे असे आदेश  मुलींच्या सर्व शाळांना आपणाकडू देण्यात यावेत जेणेकरून अशा घटना परत घडणार नाहीत. ज्या संस्था काटेकोर पणे नियमांच पालन करत नाहीत,अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शहर संघटिका सविता मते, संगिता ठोसर, कल्पना थोरवे, पल्लवी जावळे यांनी केली आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये