पुणे शहर

पुण्यात गणपती विसर्जनावेळी हे रस्ते बंद राहणार; वाहतुकीत महत्वाचे बदल

पुणे : अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विसर्जनावेळी पुण्यातले वाहतूक बदल आणि पोलीस बंदोबस्त याबद्दल माहिती दिली आहे.

पुण्यात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसंच 3,865 गणेश मंडळांचं विसर्जनाचं नियोजन असणार आहे, यासाठी मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याचं रितेश कुमार यांनी सांगितलं आहे. नागरिकांच्या वाहतूक मार्गदर्शनासाठी ’ सारथी गणेशोत्सव गाईड 2023’ सुरू केलं आहे. गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे, असंही पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

विसर्जनावेळी हे रस्ते बंद राहणार

शिवाजी रोड,लक्ष्मी रोड,बाजीराव रोड,कुमठेकर रोड,केळकर रोड,टिळक रोड,शास्त्री रस्ता,जंगली महाराज रस्ता कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता ,भांडारकर रस्ता,पुणे सातारा रस्ता ( व्होल्गा चौक ते जेधे चौक),सोलापूर रस्ता,प्रभात रस्ता हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230918 wa00064731255599054231743
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20230812 wa0001281292979418231884101793
Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये