पुणे शहर

पुणे महानगरपालिकेच्या वाहनांचे पासिंग करण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी दीड कोटी रुपयांचे टेंडर; तातडीने टेंडर रद्द करण्याची उज्वल केसकर यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेने  महापालिकेच्या वाहनांचे पासिंग करण्यासाठी आरटीओ च्या कामासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्याचे दीड कोटी रुपयाचे टेंडर काढले आहे.आरटीओ मध्ये एजंट आणि एजन्सी यांना परवानगी नाही. तसेच आरटीओ या शासकीय कार्यालयात समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही त्यामूळे हे टेंडर तातडीने रद्द करावे. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे

उज्वल केसकर म्हणाले, आयुक्त हे आय ए एस अधिकारी आहेत.त्यामूळे त्यांना माहिती असेल की,आरटीओ मध्ये एजंट आणि एजन्सी यांना परवानगी नाही. मग दीड कोटी रुपयाचे हे टेंडर कशासाठी काढले याचा खुलासा त्यांनी खातेप्रमुखांना विचारला पाहिजे. पुणे मनपा ही एक अर्ध शासकीय संस्था तर आरटीओ ही पूर्ण शासकीय संस्था आहे यामध्ये समन्वयासाठी एजन्सीची गरज नाही त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करावे ही विनंती अन्यथा आम्हाला यासाठी माननीय लोकायुक्त यांच्याकडे याचिका दाखल करावी लागेल. असा इशाराही केसकर यांनी दिला आहे.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20230918 wa00151938826641720746050
Img 20230812 wa0001281292979418231884101793
Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये