पुणे शहर

वारजेत घरफोडी करून १३ लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास..

वारजे : pune city, warje वारजे माळवाडी येथील दिंगबरवाडी शाळेजवळील शांतीसंकुल बिल्डींग मध्ये सदनिका फोडण्याचा प्रकार घडला असून १३,७०,०५०/- रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. Thieves stole Rs 13 lakh from a house in Warje.

या संदर्भात वारजे पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेठाराम जोशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

बुधवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दिगंबरवाडी शाळेजवळील शांतीसंकुल बिल्डींग , ए विंग , चौथामजला, फ्लॅट नंबर १०, हा फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना, चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील कपाटातील ९,००,०००/- रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १३,७०,०५०/- रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुंढे पुढील तपास करत आहेत. 

पुण्यात भाजप नगरसेवकांचे चेहरे बदलणार का? भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली Exclusive माहिती. पाहा व्हिडिओ

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये