पुणे शहर

पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुडमध्ये आरपीआय साठी जागा सोडाव्यात : कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुक तोंडावर आली असून या निवडणुकीत भाजप बरोबर युतीत असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासाठी कोथरुड भागात जागा सोडण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे.

पौड रस्ता परिसरात बहुजन वर्ग मोठ्या संख्येने आहे. या भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत. युतीचा धर्म पाळत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार येथील कार्यकर्त्यांनी कायम भाजप उमेदवारांचे प्रत्येक निवडणुकीत काम केले आहे, त्यामुळे आता आगामी पालिका निवडणुकीत या भागामध्ये आर पी आय आठवले गटासाठी काही जागा सोडाव्यात अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच जण कामाला लागले असून आरपीआय चे कार्यकर्ते म्हणून आम्हीही तयारीला लागलो आहोत. पक्षाची ताकद व युतीची साथ यामुळे आरपीआयचा नगरसेवक या भागात होऊ शकतो. त्यामुळे
या संदर्भात आम्ही कार्यकर्ते लवकरच मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार असून याबाबत चर्चा करणार असल्याचे मतदार संघाचे सरचिटणीस बाळासाहेब खंकाळ, अध्यक्ष जितेश दामोदरे, केशव पौळे, बळीराम शेजवळ, नवनाथ सोनावणे, रेखाताई चव्हाण, बाबासाहेब तुरुकमारे, वसंत ओहळ यांनी सांगितले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये