खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातल्याने बावधन मधील वीज प्रश्न लवकर मार्गी लागणार : कुणाल वेडे पाटील

पुणे : pune city, Bavdhan खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांच्या सूचनेनुसार बावधन मधील वीज प्रश्नाबाबत महावितरण अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली असून त्यामध्ये या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच अधीक्षक अभियंता तगडपल्लीवर यांच्या बरोबर बैठक घेण्यात येणार आहे. सुप्रिया ताईंनी स्वतः लक्ष घातले असल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे बावधन परिसरातील वीज समस्या सुटावी यासाठी पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील यांनी सांगितले.
बावधन परिसरात चालू असलेल्या वेजेच्या लपंडावामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे येथील विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महावितरण अधिकारी व स्थानिक नागरिक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक, पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला विधासनभा मतदार संघ अध्यक्ष कुणाल वेडे-पाटील, महावितरणचे शिवाजीनगर परिमंडळाचे कार्यकारी अभियंता श्री राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री पाटील, सहायक अभियंता श्री वाघमारे तसेच बावधन येथील सुमारे २० ते २५ सोसायट्यांचे अध्यक्ष, आणि सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
बावधन भागात वारंवार वीज खंडित होणे व अन्य समस्या आहेत. याबाबत गणेश खिंड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता तगडपल्लीवर यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले. त्यानंतर या भागातील सर्व समस्यांचा एक सर्वंकष आराखडा तयार करून पुढील सहा महिन्यात सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.




