कोथरूडमध्ये पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडून बचत बाजार प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या वतीने बचत बाजार प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि 26 मार्च ते २९ मार्च या कालावधीत जीत ग्राउंड, कोथरुड येथेकरण्यात आले आहे.
या बचत बाजार प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात एकूण १८० विक्री दालने बचत गट, सामाजिक संस्था, महिला व्यावसायिक सहभागी झाले आहेत प्रदर्शनात विविध कला गुणांचे सादरीकरण करण्याचे नियोजन करणेत आले आहे.

28 मार्च रोजी दु. 4.00 ते सायं 7.00 या कालावधीत लहान मुलांच्या विविध कला गुणांचे आहे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रदर्शन कार्यक्रम ठिकाणी स्वागत कक्ष येथे संपर्क साधावा, तसेच सायं 4.30 ते 8.30 या कालावधीत मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. २९ मार्च रोजी सायं. 7.30 ते 9 या कालावधीत
संगीत सियावर रामचंद्र कि जय या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आला आहे, तरी पुणे शहरातील नागरिकांनी बचत बाजार विक्री प्रदर्शनात सहभागी नव उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन पुणे महानगर-पालिका तर्फे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.









