नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर ‘कोथरूड श्री’ चा मानकरी

तरुणांना व्यायामाचे महत्व पटविण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धे सारखे क्रीडा प्रकार उपयुक्त – चंद्रकांत पाटील
कोथरूड : pune Kothrud तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार उपयुक्त असल्याचे मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या शरीराकडे लक्ष द्यावे व निरोगी आयुष्य जगावे यासाठी नमो चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असल्याचे पाटील म्हणाले.

नमो चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात “कोथरूड श्री” ह्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी भाजयुमोचे क्रीडा आघाडी चे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे यांचा विशेष सत्कार केला व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही जाहीर केले.
यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, भाजप नेते धनंजय जाधव,कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, युवा मोर्चा चे कोथरूड मंडल अध्यक्ष अमित तोरडमल, क्रीडा आघाडी चे योगेश कंठाळे, अनिश अगरवाल, राजेंद्र येडे, नितीश बराटे, सुमित दिकोंडा, स्वप्नील राजवाडे, सायंदेव देहाडराय, सूचित देशपांडे यांच्यासह महिला मोर्चा प्रभारी व कोथरूड च्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे,पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे,उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर, कविता सदाशिवे इ मान्यवर उपस्थित होते.



उत्तरोत्तर रंगलेल्या ह्या स्पर्धेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. “कोथरूड श्री” हा मुख्य किताब वर्ल्ड जिमच्या गणेश बनकरने पटकवला तर मोस्ट इम्परुव्हडं बॉडी बिल्डर चा विजेता मोहम्मद एहराज ठरला, बेस्ट पोझर चा विजेता ठरला अतुल साळुंके तर अतिक शेख ने अप कमिंग बॉडी बिल्डरचा ‘किताब पटकवीला. राजेंद्र नांगरे, नंदू कळमकर, मुस्तफा पटेल, दिलीप धुमाळ आणि सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा संयोजन प्रतीक खर्डेकर यांनी केले.



स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
५० किलो वजन गट
प्रथम क्रमांक अविनाश नायडू (महारुद्र जिम), द्वितीय क्रमांक अजय ओझरकर ( एल.सी फिटनेस), तृतीय क्रमांक निलेश गजमल (डी वाय फिटनेस)
६० किलो वजन गट
प्रथम क्रमांक हर्षल काटे( क्रिएटिव्ह फिटनेस), द्वितीय क्रमांक रोशन घारे (ओम जिम), तृतीय क्रमांक सिद्धेश गडगे (एम जी फिटनेस)
६५ किलो वजन गट
क्रमांक देवा धुमाळ (ताराजीम), द्वितीय क्रमांक अतुल साळुंखे (डायनामो फिटनेस), तृतीय क्रमांक योगेश मेंगडे (संगम जिम)
७० किलो वजन गट
प्रथम क्रमांक अतिफ शेख (ग्लाडीयटर फिटनेस), द्वितीय क्रमांक मोहसीन पठाण (एके एस जिम), तृतीय क्रमांक मयूर मोरे (इंडोरा जिम)
७५ किलो वजन गट
प्रथम क्रमांक सचिन टीमकारे (श्री फिटनेस), द्वितीय क्रमांक अरबाज शेख (क्राफ्ट फिटनेस), तृतीय क्रमांक ऋषिकेश बिरादार (स्पा फिटनेस)
८० किलो वजन गट
प्रथम क्रमांक गणेश बिनकर (वर्ल्ड जिम), द्वितीय क्रमांक वासिम शेख (क्रिएटिव्ह फिट), तृतीय क्रमांक आशिष कांबळे (ए जे फिटनेस)



