UPSC : यूपीएससीच्या वनसेवा परीक्षेत बार्टीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड


पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणी परीक्षेकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले जाते.
मे 2026 रोजी जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोग(UPSC)- वन सेवा – 2025 परीक्षेच्या निकालात बार्टीच्या 2 विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
या निकालात बार्टी (BARTI) संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे रँक मिळाल्या आहेत.






संघ लोकसेवा आयोग-वन सेवा – २०२५ मुख्य परीक्षेकरीता ५२ विद्यार्थ्यांनी आर्थिक सहाय्य व त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी मुलाखत आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतला होता.
या सर्व विद्यार्थ्यांना बार्टी संस्थेकडून परीक्षेच्या विविध टप्प्यावर मार्गदर्शन व आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे बार्टीच्या महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ- मुंडे, निबंधक डॉ सुचिता शिंदे व विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.






