संभाजी भिडेंना अटक करण्याची काँग्रेसच्यावतीने उमेश कंधारे यांची कोथरूड पोलीसांकडे मागणी

पुणे : महाराष्ट्रातील युवकांची माथी भडकवणाऱ्या संभाजी भिडे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले. या विरोधात कोथरूड काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधी भवनमध्ये मुक निदर्शन करण्यात आले.
काँग्रेस नेते उमेश कंधारे म्हणाले, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या समूहाच्या महापुरुषाबद्दल हा इसम नेहमी गरळ ओकत असतो. भाजपा सरकार याच्यावर कधीही कारवाई करायला धजावलं नाही. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बदनामी सहन करणार नाही. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी कोथरूड परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी योग्य तीं कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी, उमेश कंधारे, संदीप मोकाटे, दत्ता जाधव उमेश ठाकुर, युवराज मदगे, महेश विचारे, किशोर मारणे, विशाल भेलके,रामदास केदारी,शारदा वीर व इतर उपस्थित होते.










