पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विघ्नहर्ता मोबाईलकडून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस देशात उत्साहात आणि विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे. कोथरूड मधील व्यावसायिकानेही आपल्या दुकानाच्या काचेवर नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचे ग्लास पेंटिंग काढत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोथरूड मधील प्रसिद्ध मोबाईल शॉप असणाऱ्या विघ्नहर्ता मोबाईलकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आपल्या दुकानाच्या समोरील काचेवर मोदी यांच्या महत्वपूर्ण कामगिरीचे ग्लास पेंटिंग रेखाटत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचे काम केले आहे. त्यांनी आपल्या कामातून देश वासियांच्या मनात घर केले आहे. म्हणूनच त्यांचा वाढदिवस देशात उत्साहात साजरा केला जात आहे. आम्ही ही ग्लास पेंटिंगची संकल्पना राबवत त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे विघ्नहर्ता मोबाईल शोपीचे अमित शिंदे यांनी सांगितले.













